सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन ; शांतता कमिटीच्या बैठकीत दिलेला शब्द पाळला
सोलापूर, दि. 28 ( जिमाका):- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक सलोखा व ऐक्याची भावना चांगली राहावी व सण-उत्सव जिल्ह्यात अत्यंत उत्साहाने साजरे करावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका व जिल्हास्तरावर शांतता समितीच्या बैठका घेऊन सर्व समाजातील पदाधिकारी, प्रतिनिधी, मौलवी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन तेथे श्री गणेशाची आरती केली तसेच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेऊन काढावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाने ईद-ए-मिलाद ची दिनांक 28 सप्टेंबर रोजीची सुट्टी ही 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करणार असल्याने 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सव विसर्जन मिरवणूकसाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर दिनांक 28 सप्टेंबर रोजीची सुट्टी जाहीर करून हा सण नागरिकांना उत्साहाने व शांततेने साजरा करता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याप्रमाणेच बोर