सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला सुमारे अडीचशे ते तीनशे च्या संख्येने वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या या ठिकाणी 170 रुग्ण उपचार घेत आहेत तसेच नव्याने बी ब्लॉक मध्ये सुरू केलेले 100 बेड सुध्दा नॉन कोव्हीड रुग्ण पाहता सुरू करणे शक्य नाही असे असताना मागच्या वर्षी सुरू केलेले कामगार विमा रुग्णालय तसेच रेल्वे रुग्णालय बंद आहेत या सर्व बाबींचा विचार करता आणि भविष्यात वाढती रुग्ण संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कामगार विमा रुग्णालय तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या ठिकाणी 80 रुग्ण उपचार घेतील अशी व्यवस्था आहे तिथे चाळीस रुग्ण पहिल्या मजल्यावर आणि चाळीस रुग्ण दुसऱ्या मजल्यावर उपचार घेतील मात्र सध्या लिफ्ट बंद असल्याने ती त्वरित दुरुस्त करावी अशा सूचना असून त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा प्रशासनाने देण्याचे ठरवले आहे कामगार विमा रुग्णालयात 40 बेड हे ऑक्सिजनचे केले जाणार आहेत तसेच रेल्वे हॉस्पिटलमध्येही बेड वाढविण्याची सूचना करण्यात आल्या आहेत, शहरातील कोरोन्टाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देणे महापालिकेला बंधनकारक आहे या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले तसेच संभाजी तलावाजवळील केटरिंग कॉलेजचे सीसीसी सेंटर सुरू करण्याच्या ही सूचना आपण देणार असल्याचे ते म्हणाले, सिविल हॉस्पिटल ने कंत्राटी कर्मचारी भरतीचा प्रस्ताव दिला असून लवकरच नव्याने भरती केली जाणार आहे.
बुधवारी महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले व जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी अजय पवार यांनी रेल्वे हॉस्पिटल आणि कामगार राज्य विमा हॉस्पिटल याची पाहणी केली आहे.
Comments
Post a Comment