सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या पोटाच्या ऑपरेशन साठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भाई गणपतराव देशमुख ते सध्या 96 वर्षांचे आहेत सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची बातमी सध्या वार्यासारखी पसरली आहे मात्र रुग्णालयात त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, त्यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख, इतर कुटुंबातील अनेक नातेवाईक तसेच सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इतर पक्षाचे पदाधिकारी हे सध्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहेत
त्यांच्या प्रकृतीची प्रत्येक मिनिटाला माहिती घेत आहेत, वयोमानानुसार यांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते स्थिर आहेत, त्यांच्या पोटाचे ऑपरेशन झाल्याने ते ऑक्सिजनवर आहेत सध्या सोशल मीडियावर पसरलेली मृत्यूची माहिती ही खोटी असल्याचं डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितलं आहे.
Comments
Post a Comment