धक्कादायक ब्रेकींग : सोलापूरचे चौघे जागीच ठार ? ; काँग्रेसचा युवा नेता ठार झाल्याची माहिती ; सविस्तर माहिती थोड्या वेळानेप
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये सोलापूरचे चार जण जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळत आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एम एच 13 बी एन 7122 या स्विफ्ट कार मध्ये काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांच्यासह चौघे जण सोमवारी रात्री मुंबईला निघाले होते आणि याच गाडीचा भीषण अपघात झाला आहे. याची माहिती मिळताच काँग्रेसचे नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद भोसले यांनी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे हे सध्या खोपोली कडे निघाले आहेत अद्यापि मृतांची अधिकृत नावे समोर आलेले नाहीत.
विविध सोर्स द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.
महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. घटनेचे फोटो आणि व्हिडिओ भयानक आहेत.(साभार आसबे ब्युरो)
Comments
Post a Comment