मोहोळ : आरटीओ वाहन आणि कंटेनरच्या चुकीमुळे मोहोळ जवळ झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील एका शेतकऱ्याचा नाहक मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
शिरापूरचे प्रगतशील बागायतदार मोहन दत्तात्रय आदमाने हे मोटारसायकलवरून मोहोळ कडून लांबोटिकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलला आरटीओ अधिकाऱ्यांच्या गाडीने ओव्हरटेक करत पुढे गेले व पुढे असणाऱ्या कंटेनरला गाडी आडवी लावल्यामुळे त्या कंटेनरने अचानक ब्रेक मारला. आदमाने हे त्या कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास वडवळ कोळेगाव दरम्यान घडली आहे. उपस्थित नागरिकांनी आरटीओ कार्यालयाच्या वाहनांची मोडतोड केली आहे .या अपघाताला तेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भूमिका सध्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिस स्टेशन मध्ये घेतली आहे. रविवारी रात्री सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी जवळ पंढरपूरला एकादशीनिमित्त निघालेल्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास याच मार्गावर अपघात झाला आहे.
Comments
Post a Comment