Skip to main content

भीषण अपघात : थांबलेल्या ट्रकला कारची धडक पोलिस कॉन्स्टेबलसह दोघे सख्खे भाऊ जागीच ठार ; वाचा सविस्तरपणे

 

 






मोहोळ : पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन  घेऊन आपल्या कुटुंबास घराकडे परत  निघालेल्या पोलीस कॉन्स्टेबल च्या ओमनी कारची धडक रस्त्याच्या कडेला धोकादायक स्थितीत उभ्या  असलेल्या ट्रकला बसून झालेल्या अपघाता मध्ये दोघे भाऊ जागीच ठार तर कुटूंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि ४ एप्रिल रोजी दुपारी  तीनच्या दरम्यान  पंढरपूर रस्ता जवळील सारोळे पाटी येथे घडली. दयानंद अण्णाराव बेलाळे वय 30 असे पोलीस कॉन्स्टेबल चे नाव असून त्याचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे वय 32 दोघे रा रोखडा सावरगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर असे मृताचे नाव आहे.


 मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंढरपूर वरून श्री पंढरपुरच्या पाडूरंगाचे दर्शन घेऊन घराकडे परत निघाले असताना अचानक काळाने घाला घातला ते पंढरपूर हुन मोहोळ कडे निघालेल्या एम एच १२ एफ झेड 73 77 या ट्रकचालकाने सारोळे पाटी जवळील सह्याद्री ढाब्या  समोर आपली ट्रक धोकादायक स्थितीत उभा करून धाब्यावर  जेवण घेण्यासाठी  गेला होता. यावेळी आपल्या कुटुंबासह निघालेले सोलापूर येथील मुख्यालयात कॉन्स्टेबल म्हणून काम करणारे दयानंद अण्णाराव बेलाळे त्यांचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे त्यांची पत्नी स्वाती उर्फ राणी सचिन बेलाळे वय 22 व दिपाली उर्फ जयश्री दयानंद बेलाळे  वय 25 व त्यांची दोन लहान मुले त्रिशा वय आठ वर्ष व श्लोक वय १ वर्ष हे  सर्वजण आपल्या ओमनी कार  एम एच 12 एन ई 44 87 या कार ने थांबलेल्या ट्रक ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दयानंद  व त्याचा भाऊ सचिन  या दोघांचा जागीच मृत्यू झाला.


तर या दोघांच्या पत्नी स्वाती व दीपाली व मुले त्रिशा व श्लोक हे सर्व जण गंभीर जखमी झाले यांना खाजगी वाहनातून सोलापूर येथील खाजगी सीएनएस या हॉस्पीटल  मध्ये दाखल करण्यात आले या अपघाताचा  गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यामध्ये  उशिरापर्यंत दाखल करण्यात आला नव्हता मात्र कॉन्स्टेबल दयानंद यांच्या मृत्यूने मात्र मोहोळ पोलीस ठाणे व सोलापुर मुख्यालय यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

Comments

  1. Aple vahan Asha beshista padhatine parking karun apghatala karnibhut asnarya vahan chalakawar sadosh manushya vadhacha gunah dakal karawa

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सोलापूर : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; 25 हजाराची लाच घेताना सापडले

  सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभारावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा नाराज असल्याचे चित्र होते. शेवटी लाचखोर लोहारच्या हाती बेड्या पडल्याचं. यातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी शिक्षण संस्था असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आठवी ते दहावी वर्ग वाढीसाठी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. तेव्हा यु-डायस प्रणालीतून अर्ज पुणे शिक्षण संचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लोहारचा डाव 28 ऑक्टोबर रोजी साधला गेला असता मात्र ते कोल्हापूरला गेल्याने सोमवार सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावणेसहा वाजता लाचलुचपत विभागाची कारवाई झाली.  तक्रारदार हे तडजोडीअंती ठरलेली 25 हजाराची रक्कम घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यावेळी संबंधित टेबलचा क्लार्क पटेल यांनी तुमच्या तुम्हीभेटा साहेबांना, माणूस बरोबर नाही म्हणून सांगितले, तक्रारदार यांनी लोहार यांच्या केबिनमध्ये जाऊन 25000 ची रक्कम देतात सापळा लावलेल्या अँटी करप्शन विभागाने लगेच लोहार यांना रं

ब्रेकिंग : सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

  सोलापूर : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल 41 बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भर पावसात धोकादायक शाळा तपासल्या ; खिचडी खाल्ली, मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पण दिली...

  सोलापूर - सलग दोन दिवस पडत्या पावसात जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारत असलेल्या शाळेची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्केडेंय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर आज बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. कामात हालगर्जीपणा केल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.  यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळा धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेनंतर आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्केडेंय नगरचे इमारतीची पाहणी मंगळवारी केली. शाळेची झालेली दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेणे बाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सुचना दिल्या. मुलांचा व शिक्षकांचा हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. अंधुक उजेड असलेले शाळेच्या खोलीत सुर्यप्रकाशाच्या उजेडात त्यांनी पाहणी करून शिक्ष