Skip to main content

मोठी ब्रेकींग : पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील एपीआय शीतलकुमार कोल्हाळसह सात पोलिसांवर गुन्हा दाखल ; सीआयडीने दिली फिर्याद

 


सोलापूर : दरोडा व जबरी चोरी गुन्ह्यातील पारधी समाजातील आरोपी भीमा काळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हे अन्वेषण विभागाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या बरोबर इतर पाच पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. यापूर्वी डान्स बार प्रकरणात त्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. आरोपी भीमा काळे याचा मृत्यू नंतर त्याची पत्नी आणि मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थेट पोलिसांवर आरोप केला होता.

मयत : भीमा काळेसिद्रामप्पा गजा, पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, सोलापूर पथक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वपोनि उदयसिंह शामराव पाटील, सपोनि  शितलकुमार मारुती कोल्हाळ,  पोहेकॉ  श्रीरंग तुकाराम खांडेकर,  पोना शिवानंद दत्तात्रय भिमदे,  पोना अंबादास बालाजी गड्डुम, पोशि अतिश काकासाहेब पाटील.  पोना लक्ष्मण पोमु राठोड, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर या सात जणां विरुद्ध भादंविसक ३०४,३३०,१६६,३४ प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे अंतर्गत भादविसंक ४५४,४५७,३८० या गुन्हयातील आरोपी नामे भिमा रज्जा काळे, वय ४२ वर्षे, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर यास दि. २२/०९/२०२१ रोजी जिल्हा कारागृह सोलापूर येथुन सपोनि कोल्हाळ यांनी वर्ग करुन ताब्यात घेवून  न्यायालयाकडून त्याची दि. २२/०९/२०२१ रोजी ते दि. २५/०९/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेतलेली होती. पोलीस कस्टडीत असताना आरोपीस सर्दी, ताप, खोकला व उलटया होत असल्याने व दोन्ही पायास कशाचेतरी संसर्ग झाल्यामुळे व त्याचे दोन्ही पाय सुजल्याने त्यास उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दि. २४/०९/२०२१ रोजी १४.२५ वा मेडीकल यादीसह सपोनि कोल्हाळ तत्कालीन नेम विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी उपचारास दाखल केले असता त्याच्यावर उपचार चालु असताना आरोपीत भिमा रज्जा काळे हा दि. ०३/१०/२०२१ रोजी २०.४५ वा मयत झाल्याने विजापूर नाका पोलीस ठाणे अ.म.र.नं. १११/२०२१ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आलेली आहे.सदर मयताचे झालेल्या तपासावरुन गुन्हयातील अटक आरोपी भिमा रज्जा काळे यांनी गुन्हा कबुल करावा व गुन्हयातील चोरीस गेलेला माल काढुन दयावा म्हणून त्यास गुन्हयाचे तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि कोल्हाळ, पोहवा श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोना  शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोना अंबादास बालाजी गड्डम, पोशि अतिश काकासाहेब पाटील, व पोना  लक्ष्मण पोमु राठोड यांनी पोलीस कस्टडीतील आरोपीस मारहाण केली आहे.तसेच विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील यांनी वि. ना.पो.ठाणे गु.र.नं. ३९५ / २०२१ कलम ४५४,४५७,३८० भादविसं या गुन्हयातील तपासी अधिकारी सपोनि कोल्हाळ यांना गुन्हयाच्या तपासामध्ये मार्गदर्शक सुचना दिलेचे दिसुन आले नाही.  तसेच दि. २२/०९/२०२१ रोजी रात्री २०.०० वा चे सुमारास तपासीक अधिकारी यांनी यातील अटक आरोपी नामे मिमा रज्जा काळे यास त्यांचेसमक्ष हजर केले. त्यावेळी आरोपी हा लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास येवून सुध्दा आरोपीस वैदयकीय उपचाराची आवश्यकता असतानासुध्दा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे दिलेले मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्याची छायाचित्रण जतन करण्याचे प्रशासकीय जबाबदारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यावर येते. परंतु विजापूर नाका पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरा असने आवश्यक असताना सदर ठिकाणी उपलब्ध केला नाही. आरोपीत मजकूर यांनी वि. ना. पो. ठाणे गु.र.नं. ३९५ / २०२१ मधील आरोपीत भिमा रज्जा काळे (मयत) यास केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे तसेच सदरील मयत ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहित असतानाही त्याची वैद्यकीय आजारपणे व मारहाणीमुळे झालेल्या जखमांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्युस कारणीभुत झाले. या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी जी व्ही दिघावकर, नेम गुन्हे अन्वेषण विभाग भरारी पथक पुणे हे करीत आहेत.Comments

Popular posts from this blog

सोलापूर : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; 25 हजाराची लाच घेताना सापडले

  सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभारावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा नाराज असल्याचे चित्र होते. शेवटी लाचखोर लोहारच्या हाती बेड्या पडल्याचं. यातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी शिक्षण संस्था असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आठवी ते दहावी वर्ग वाढीसाठी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. तेव्हा यु-डायस प्रणालीतून अर्ज पुणे शिक्षण संचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लोहारचा डाव 28 ऑक्टोबर रोजी साधला गेला असता मात्र ते कोल्हापूरला गेल्याने सोमवार सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावणेसहा वाजता लाचलुचपत विभागाची कारवाई झाली.  तक्रारदार हे तडजोडीअंती ठरलेली 25 हजाराची रक्कम घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यावेळी संबंधित टेबलचा क्लार्क पटेल यांनी तुमच्या तुम्हीभेटा साहेबांना, माणूस बरोबर नाही म्हणून सांगितले, तक्रारदार यांनी लोहार यांच्या केबिनमध्ये जाऊन 25000 ची रक्कम देतात सापळा लावलेल्या अँटी करप्शन विभागाने लगेच लोहार यांना रं

ब्रेकिंग : सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

  सोलापूर : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल 41 बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भर पावसात धोकादायक शाळा तपासल्या ; खिचडी खाल्ली, मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पण दिली...

  सोलापूर - सलग दोन दिवस पडत्या पावसात जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारत असलेल्या शाळेची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्केडेंय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर आज बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. कामात हालगर्जीपणा केल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.  यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळा धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेनंतर आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्केडेंय नगरचे इमारतीची पाहणी मंगळवारी केली. शाळेची झालेली दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेणे बाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सुचना दिल्या. मुलांचा व शिक्षकांचा हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. अंधुक उजेड असलेले शाळेच्या खोलीत सुर्यप्रकाशाच्या उजेडात त्यांनी पाहणी करून शिक्ष