सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी टोलनाक्यावर टोल मागितल्याच्या कारणावरून एसआरपीएफ पोलिसाच्या गाडीतील सहा जणांनी मिळून टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच एसआरपीएफ पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली गाडी ही एस आर पी एफ पोलिसाची आहे ती गाडी व आतील तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात कर्मचारी नागेश भीमाशंकर स्वामी (वय 28) राहणार टोलनाका नांदणी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. रोहन सुरेश जाधव (वय ३०), गजानन आणाराव कोळी (२९) (दोघे रा सैफुल), सुरज बबनराव शिकारे (वय ३१) शिवशंकर बबनराव शिकारे (वय२५) (हा srpf पोलीस शिपाई आहे ) रा. उद्धव नगर सैफुल सोलापुर व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी हे सर्व जेवण करायला टाकळी येथे (इनोव्हा गाडी क्रमांक एम एच ०२ एक कयु ४४५५) मधून गेले होते, जेवण करून येत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास, टोल नाक्यावरती टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान गाडीतील चौघांनी तलवारी हातात घेऊन कर्मचाऱ्यांना धाक दाखवत मारहाण व टोलनाक्याच्या कार्यालयाचे तोडफोड करून नुकसान केले आहे. या प्रकरणी कलम ३२३,३२६,५०४,५०६,४२७,१४३,१४७,१४८,१४९,भादवि आर्म ऍक्ट ४/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित करपे हे करत आहेत.
Comments
Post a Comment