सोलापूर : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; 25 हजाराची लाच घेताना सापडले
सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभारावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा नाराज असल्याचे चित्र होते. शेवटी लाचखोर लोहारच्या हाती बेड्या पडल्याचं.
यातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी शिक्षण संस्था असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आठवी ते दहावी वर्ग वाढीसाठी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. तेव्हा यु-डायस प्रणालीतून अर्ज पुणे शिक्षण संचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लोहारचा डाव 28 ऑक्टोबर रोजी साधला गेला असता मात्र ते कोल्हापूरला गेल्याने सोमवार सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावणेसहा वाजता लाचलुचपत विभागाची कारवाई झाली.
तक्रारदार हे तडजोडीअंती ठरलेली 25 हजाराची रक्कम घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यावेळी संबंधित टेबलचा क्लार्क पटेल यांनी तुमच्या तुम्हीभेटा साहेबांना, माणूस बरोबर नाही म्हणून सांगितले, तक्रारदार यांनी लोहार यांच्या केबिनमध्ये जाऊन 25000 ची रक्कम देतात सापळा लावलेल्या अँटी करप्शन विभागाने लगेच लोहार यांना रंगेहात पकडले.
साहेबांवर अँटी करप्शनची रेट झाल्याचे समजतात शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी धूम ठोकली. अँटी करप्शन विभागाच्या पोलिसांनी लोहार सहित संबंधित टेबल सांभाळणाऱ्या पटेल यांनाही चौकशीसाठी सोबत नेले. साहेब रंगेहाथ सापडल्याचे समजताच त्यांचे वसूलदार अधिकाऱ्यांची धांदल उडाली.
चार ते पाच जण साहेब यातून कसे सुटतील यासाठी अँटीकरप्शन कार्यालयाच्या अवतीभोवती प्रयत्न करत होते मात्र त्याचवेळी मीडिया लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात दाखल झाली होती. मीडिया सोबतच तक्रारदार हे ठाम राहिले. त्यामुळे डाव साधता आला नाही. एवढी मीडिया एकदम जमा झाल्याचे समजताच उपअधीक्षक संजीव पाटील हे तातडीने दाखल झाले. त्यांनी माध्यमांसमोर आपली अधिकृत माहिती दिली. मात्र क्लार्क पटेल यांचा या विषयात कोणताही संबंध नाही त्यांना जाणीवपूर्वक गोतले जाऊ नये म्हणून तक्रारदार हे रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयात थांबून होते. रात्री अकराच्या सुमारास पटेल यांना चौकशी करून सोडून देण्यात आले. त्यानंतर रात्री दीड वाजता स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल होऊन लोहार यांना त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर तक्रारदार हे तिथून घरी गेले.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 25 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. किरण लोहार यांच्या सोबतच प्राथमिक शिक्षण विभागातील एका लिपिकास चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.
किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण 13 महिने झाले होते मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या.
शेवटी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडलाच. या प्रकरणातील तक्रारदार हे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे. त्यांना इयत्ता आठवी ते दहावी या वर्ग वाढीसाठी यूडायस या प्रणालीत नोंदणी करून प्रस्ताव पुढे शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठवण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी यांनी 25000 देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून 45 मिनिटांनी त्यांना 25000 घेतल्याचे रंगेहात पकडण्यात आले आहे सविस्तर माहिती थोड्यावेळाने.
वाट लावा याची खूपच बोगस आहे
ReplyDeleteNalayk manus ahe ha disle gurujila pn yane khup tap dila
DeleteEk number Kam zal..
ReplyDeleteAsalyana jelamadhye kayamach thevale pahije
ReplyDeleteNayakala khadi fodayla pathava 100रू रोजंदारीवर.
ReplyDeleteखुप उशीर झाला याला पकड़ायला त्याची मालामत्ता किती आहे बघा अगोदर
ReplyDelete