सोलापूरच्या सिद्धेश्वर बँकेत कपबशीची लढत विमान आणि कपाटशी ; सर्वसाधारणच्या 10 जागेसाठी 12 उमेदवार रिंगणात ; हे आहेत उमेदवार
सोलापूर : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या सिद्धेश्वर सहकारी बँकेची निवडणूक अखेर लागली. 15 संचालक मंडळ असलेल्या या बँकेच्या महिला 2, अनुसूचित जाती जमाती 1, ओबीसी 1 व भटक्या विमुक्त जाती जमाती 1 या पाच जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित दहा सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक होणार आहे. या दहा जागेसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे पॅनलने कपबशी हे चिन्ह घेतले आहे, तर विरोधातील नागनाथ जावळे यांना विमान तर बसवराज माशाळे यांना कपाट हे चिन्ह मिळाले आहे.
शिवदारे पॅनल मधील दहा उमेदवार पुढील प्रमाणे...
बाळासाहेब आडके, शिवानंद कोनापुरे, नरेंद्र गंभीरे, प्रकाश वाले, मल्लिनाथ पाटील, पशुपती माशाळ, सिद्धेश्वर मुनाळे, प्रकाश हत्ती, इरप्पा सालक्की, महेश सिंदगी.
तब्बल तेरा हजार सभासद मतदार असलेल्या सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 4 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे हे काम पाहत आहेत.
बिनविरोध झालेल्या पाच जागा पुढील प्रमाणे
महिला मतदार संघ
1 रूपाली बसवराज बिराजदार
2 सुचिता मिलिंद थोबडे
अनुसूचित जाती
1 अशोक लांबतुरे
इतर मागासवर्ग
1 भीमाशंकर म्हेत्रे
व्हीजेएनटी
1 तुकाराम काळे
Comments
Post a Comment