Skip to main content

सोलापुरात हजारों नयनांनी पाहिला हा भव्यदिव्य सोहळा ; लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

 


सोलापूर : रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना...लगीन घाई सुरु... 40 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली... या जोडप्यांना कुठलाच धर्म नव्हता, आयुष्यभर साथ देण्यासाठी... त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते.


माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 27 नोव्हेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला. या विवाह सोहळ्यात 40 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या.


सकाळी सर्व वधू- वरांना आ. सुभाष देशमुख यांनी समुपदेशन केले. वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सपारी व रुखवत साहित्य देण्यात आले. विवाह सोहळ्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. रक्तदान शिबिरही घेण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. मसाले भात, पोळी भाजी, भजी आणि मोतीचूर लाडू असा मेनू होता.


गेल्या दोन वर्षी कोरोनाकाळामुळे वधू-वरांची मिरवणूक काढली नव्हता. यंदा कोरोना संपल्यामुळे वधू-वरांची रिक्षातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.


यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले.


सायंकाळी गोरस मुहूर्तावर सुरवातीला बौद्ध पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यानंतर हिंदू रितीप्रमाणे उर्वरित विवाह पार पडले.


यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, रेणुक शिवाचार्य महाराज,  पंचाक्षरी महास्वामी, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख,  मनीष देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,  बसवराज शात्री, ह. भ. प.  शिवपुत्र स्वामी महाराज, ह. भ. प.  ज्योतिराव चांगभले  महाराज, ह.  भ.  प.  विष्णुपंत मोरे महाराज, ह.  भ.  प.  रमेश महाराज शिवपूरकर,  ह.  भ.  प.  बळीराम जांभळे  महाराज, ह.  भ. प.  संजय केसरे, महाराज, ह.  भ. प. अभिमन्यू डोंगरे महाराज, नरेंद्र काळे , अमर बिराजदार , गणेश चिवटे, सोमनाथ केंगनाळकर, सभापती गुरुसिद्ध मेह्त्रे, डॉ. चनगोंडा हवीनाळे, शशी थोरात, महेश  देवकर, श्रीनिवास करली , भाजपचे  दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सचिन चव्हाण, मनिषा हुचे  यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


 

शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू : आ.  देशमुख 

आपण या समाजात जन्मलो आह. त्यामुळे समाजाचे ऋणी लागतो म्हणून लोकमंगल परिवार जनतेबरोबर आहे. लोकमंगलच्या या प्रयत्नाला सर्वांनी साथ द्यावी.  सर्वांची साथ मिळाल्यास शेवटच्या माणसाचेही अश्रू पुसण्याचे काम आपण करू त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा  आणि महाराष्ट्राचा  नावलौकिक होईल,  असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी केले. 


 

Comments

Popular posts from this blog

सोलापूर : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार अँटीकरप्शनच्या जाळ्यात ; 25 हजाराची लाच घेताना सापडले

  सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभारावर खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुद्धा नाराज असल्याचे चित्र होते. शेवटी लाचखोर लोहारच्या हाती बेड्या पडल्याचं. यातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या ठिकाणी शिक्षण संस्था असून ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आठवी ते दहावी वर्ग वाढीसाठी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. तेव्हा यु-डायस प्रणालीतून अर्ज पुणे शिक्षण संचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लोहारचा डाव 28 ऑक्टोबर रोजी साधला गेला असता मात्र ते कोल्हापूरला गेल्याने सोमवार सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावणेसहा वाजता लाचलुचपत विभागाची कारवाई झाली.  तक्रारदार हे तडजोडीअंती ठरलेली 25 हजाराची रक्कम घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यावेळी संबंधित टेबलचा क्लार्क पटेल यांनी तुमच्या तुम्हीभेटा साहेबांना, माणूस बरोबर नाही म्हणून सांगितले, तक्रारदार यांनी लोहार यांच्या केबिनमध्ये जाऊन 25000 ची रक्कम देतात सापळा लावलेल्या अँटी करप्शन विभागाने लगेच लोहार यांना रं

ब्रेकिंग : सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी कुमार आशीर्वाद तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती

  सोलापूर : राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या तब्बल 41 बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भर पावसात धोकादायक शाळा तपासल्या ; खिचडी खाल्ली, मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पण दिली...

  सोलापूर - सलग दोन दिवस पडत्या पावसात जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारत असलेल्या शाळेची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केली. सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या मार्केडेंय नगर येथील जिल्हा परिषद इमारतींची पाहणी मंगळवारी तर आज बुधवारी मजरेवाडी व कुमठे येथील प्राथमिक शाळांची पाहणी जिल्हा परिषेदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. कामात हालगर्जीपणा केल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.  यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी संजय जावीर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ निंबर्गी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळा धोकादायक असल्याचे निदर्शनास आलेनंतर आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी मार्केडेंय नगरचे इमारतीची पाहणी मंगळवारी केली. शाळेची झालेली दुरावस्थेबद्दल त्यांनी तात्काळ मुलांची सुरक्षितता घेणे बाबत मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांना सुचना दिल्या. मुलांचा व शिक्षकांचा हजेरी रजिस्टर तपासून मुलांशी संवाद साधला. अंधुक उजेड असलेले शाळेच्या खोलीत सुर्यप्रकाशाच्या उजेडात त्यांनी पाहणी करून शिक्ष