ब्रेकिंग : फॉर्च्युनर गाडी 50 फूट खोल कालव्यात पडली ; 1 महिला ठार तिघे जखमी BVG Ambulance च्या टीमने वाचवले प्राण

 
सोलापूर : खराब रस्त्यामुळे फॉर्च्युनर गाडी थेट 50 फूट खोल कालव्यात पडून झालेल्या अपघातात 1 महिला जागीच ठार झाली तर इतर तिघे जखमी झाले. बिव्हीजी 108 क्रमांकाच्या अँबुलन्सच्या डॉक्टरांच्या टीमने इतरांच्या मदतीने हे मदत कार्य केले.


कुर्डूवाडी ते पंढरपूरकडे रोडवर निघालेली फॉर्च्युनर गाडी आष्टी जवळील रोडवर असणाऱ्या उजनी डावा कालवा या 40 ते 50 फूट खोल कालव्यात गाडी पडली.  त्यावेळेस पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी त्याठिकाणी लगेच थांबून 108 ॲम्बुलन्सला बोलवून घेतले. 


मात्र कालव्याची उंची खोल असल्यामुळे त्यांना उतरता येत नव्हते, उतरायला रस्ता नव्हता. तेव्हा दोरीच्या साहाय्याने कॅनलमध्ये उतरण्यात आले.  108 ॲम्बुलन्समधील पेशंटला शिफ्ट करण्यासाठी ट्रान्सफर सीट असते. त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरमधील दोरी घेतली व त्यांना चारही बाजूला बांधून ते सीट खाली सोडण्यात आले व सर्वांनी मिळून मयत व जखमीना  बाहेर काढले. त्यातील एक महिला गंभीर जखमी झाली होती ती पाण्यात बराच वेळ राहिल्याने त्यांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. 

अंबिका अण्णा देशमुख वय वर्ष 34,  जानवी अण्णा देशमुख वय वर्ष 10,  अण्णा देशमुख वय वर्ष 35 अशी जखमींची नावे आहेत तर मीना देशमुख वय वर्ष 50 या मरण पावल्या. हे सर्वजण मोडनिंबहून पंढरपूर कडे निघाले होते.


या जखमींना शेटफळ येथील ॲम्बुलन्स क्रमांक 1095 चे  डॉक्टर शुभम भोसले व पायलट चव्हाण तसेच पंढरपूर विठ्ठल मंदिर येथील ॲम्बुलन्सचे डॉक्टर सचिन भोसले व सचिन अहिरे तसेच सोलापूर जिल्हा समन्वयक अनिल काळे असे चार ते पाच जणांच्या टीमने अतिशय जोखमीने काम करून जीवदान दिले आहे.

Post a Comment

0 Comments