बार्शी शाखा अभियंता लाच प्रकरण ; इतक्या हजाराच्या जामीनावर झाली सुटका

 
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय बार्शी येथील शाखा अभियंता आयुब दस्तगीर शेख यांनी नारीवाडी ग्रामपंचायत येथे असलेल्या हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे झालेल्या कामाची मोजमापे घेऊन त्याचे बिल तयार करून ते पुढील कार्यवाही करिता उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम यांच्याकडे सादर करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे रक्कम रुपये 2000 लाचेची मागणी केली म्हणून तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत विभागाकडे आरोपी आयुब शेख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती. तक्रारदाराकडून रक्कम रुपये 2000 /- स्वीकारताना आरोपी आयुब शेख यांच्या कार्यालयात रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपीच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.


सदर प्रकरणात बार्शी येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जयेंद्र. सी. जगदाळे सोऻ यांनी आरोपी आयुब दस्तगीर शेख यांची रक्कम रुपये १५,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली. 


यात आरोपी आयुब दस्तगीर शेख यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड कैलास बडवे, ॲड. मल्लिनाथ बिराजदार,  ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी, ॲड. सोनाली कोंडा, ॲड. लता कॅरमकोंडा यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments