सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आता शेतकरी मैदानात ; कलेक्टर कचेरीवर आंदोलन सुरू

 सोलापूर विकास मंच सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीवर ठाम आहे. ही भूमिका पाहून शेतकऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थाना समोरील उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात केली आहे. 


होटगी रोड विमानतळावर विमानसेवा सुरू करण्यासाठी कारखान्याची चिमणी पाडली तर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद होईल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. होटगी रोड येथून विमानसेवा सुरू करण्याऐवजी सोलापूर हैदराबाद मार्गावरील बोरामणी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, येथून दररोज विमानसेवा सुरू करावी. 


साखर कारखाना बंद पडला तर शेतकऱ्यांचे नुकसान तर होईलच तसेच साखर कारखान्यामधील अनेक कामगारांचे रोजगार जातील. त्यामुळे सोलापूरचा विकास व्हावा, पण शेतकऱ्यांचा देखील विचार करण्यात यावा अशी मागणी यावेळी संचालक शिवानंद पाटील यांनी केली.
Post a Comment

0 Comments