सोलापुरात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीची मनमानी ; शेतातील आंब्याची झाडं तोडली, नुकसान भरपाई मात्र नाही
सोलापूर : जिल्ह्यातून इंडियन ऑईल कंपनीची पाईललाईन जात आहे. सध्या या कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांसह आंब्याच्या बागेचं नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी 1 डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील शेतकरी कुटुंब अनुराधा सुधीर ननवरे व सुधीर ननवरे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेत आपली कैफियत मांडली.
ते म्हणाले, आमच्या गट नं. १२८/५/अ व १२८/५/ब या शेत जमिनीमध्ये इंडियन ऑईल कंपनीचे पाईल लाईन जात आहे. आम्ही त्यांना विरोध केला नाही व करणार ही नाही. परंतु त्यामुळे झालेल्या ४५ कलमी केशर अंब्याची झाडे कंपनीने पोकलँड मशिन द्वारे तोडून नुकसान केले. परंतु त्यापोटी कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. आजतागायत पर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. आम्ही वेळोवेळी मागणी केली असता कोणतेही उत्तर आले नाही.
नुकसान भरपाई सरकारी नियमानुसार मिळत नाही. सोलापूर येथील इंडियन ऑईल कंपनी आमचे म्हणने व लेखी तक्रार स्विकारत नाही. त्यामुळे आमच्या शेत पिकाचे नुकसान सरकारी नियमानुसार मिळावं अन्यथा आम्ही 1 डिसेंबर 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार आहे.
Comments
Post a Comment