सोलापुरात मनसे कार्यकर्त्यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

 
सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 40 गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी  केलाय. यावर आता संपूर्ण महाराष्ट्रात वादंग उठले आहे सर्व राजकीय स्तरातून विरोध होताना दिसत आहे. जागोजागी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईं यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापुरात चार हुतात्मा स्मारकासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, अभी रंपुरे, गोविंद बंदपट्टे यांच्यासह इतर सहभागी होते. यावेळी कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. पोलीस परवानगी विना आंदोलन केल्याने मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली...Post a Comment

0 Comments