सोलापूर : महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम मंगळवारी सोलापुरात होता. स्वतः आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुनावणी घेतली. त्यांनतर पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात राबविलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या मुलींसाठी सायकल बँक या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले, या उपक्रमामुळे हजारो मुलींचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी हा उपक्रम राबवावा यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहा त्या काय म्हणाल्या..
Comments
Post a Comment