मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामींनी साजरा केला द्विव्यांगासोबत राष्ट्रीय संविधान दिन

 

सोलापूर- दि.26 नोव्हेंबर. 'राष्ट्रीय संविधान दिन' जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण विभागाच्यावतीने राष्ट्रीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास 150 पेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थी जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते. 


या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप स्वामी म्हणाले की, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, त्याच प्रमाणे समाजातील वंचीत घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, बालमृत्युचे प्रमाण कमी करणे, मुला-मुलीचे कुपोषण प्रमाण कमी करणे, गर्भलिंग चाचण्या शुन्यावर आणणे, बालविवाह प्रथा तसेच शिक्षणामधील टक्का वाढविणे यासाठी सर्वानी प्रयत्न करणे संविधान दिन साजरा करणे यासारखे होईल.


या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड,शिक्षणाधिकारी संजय जावीर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, प्रकल्प संचालक कुलकर्णी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे तसेच दिव्यांग विभाग प्रमुख सचिदानंद बांगर उपस्थित होते. कक्ष अधिकारी, मगे, शशिकांत ढकळे उपस्थित होते.


राष्ट्रीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदरची रॅली चार हुतात्मांना अभिवान करून सुरुवात झाली. त्यानंतर मा.डॉ. बाबासाहेब आंबडकर यांना अभिवादन करून पुढे डरफीन चौकमार्गे रंगभवन चौकातून जिल्हा परिषद आवारामध्ये रॅलीची सांगत करण्यात आली.


सदरचा कार्यक्रमानंतर दिव्यांग विद्यार्थीना खाऊ वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग विभागातील कर्मचारी, कमलाकर तिकटे, पारेकर, कुरमुत्ते तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी व दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी सहकार्य केली.

Post a Comment

0 Comments