'चिमणी'पडण्याचे राजकारण कराल तर ऊसाचा कोयता घेऊन मागे लागू ; माजी आमदार शिवशरण पाटील यांचे काडादी यांना समर्थन


सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हीच विमानसेवेला अडथळा असून ती पडल्याशिवाय विमानसेवा शक्य नाही यासाठी सोलापूर विकास मंचचे प्रमुख केतन शहा हे मागील अनेक दिवसांपासून चक्री उपोषण करीत आहेत. बऱ्याच संघटना, समाजाचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. शनिवारी धर्मराज काडादी व केतन शहा यांच्यात झालेल्या वादानंतर काडादी यांनाही राजकीय पाठिंबा मिळत आहे. माजी आमदार शिवशरण पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन काडादी यांचे समर्थन केले.


 माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, विमानसेवा सुरू झालीच पाहिजे पण ती कारखान्याची चिमणी पाडून नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे विमान येतात जातात तेव्हा चिमणी कुठे अडथळा येत नाही. मग आताच का? हे चिमणी पाडण्याचे व कारखाना बंद करण्याचे राजकारण सुरू आहे. हजारो शेतकरी या कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यांचा संसार चालतो. चिमणी पाडण्याचे राजकारण केला तर जळून खाक होचाल, शेतकरी संतापला तर ऊस तोडायचा कोयता घेऊन तुमच्या मागे लागेल असा गंभीर इशारा शिवशरण पाटील यांनी दिला पहा ते काय म्हणाले..Post a Comment

0 Comments