सोलापूरच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांची बदली ; अजित बोऱ्हाडे आले उपायुक्त

 सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक दर्जाच्या भापोसे-रापोसे 19 अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापना दिल्या त्यामध्ये सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडुकर यांची बदली झाली आहे. उपायुक्त म्हणून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले अजित बोऱ्हाडे यांची नियुक्ती सोलापूरला झाली आहे. वैशाली कडूकर या सोलापुरातच राहणार असून त्यांची नियुक्ती सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त पदावर काम करताना डॉक्टर वैशाली कडूकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापुरात काम केले आहे. कोरोना काळात त्यांचे कामकाज अतिशय नावाजले गेले. 

Post a Comment

0 Comments