लोहारच्या खुर्चीची जागा नको रे बाबा...! प्रभारी शिक्षणाधिकारी जावीर यांनी बदलली खुर्चीची दिशा | सोलापूर

 
सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजार रुपयाची लाच घेताना 31 ऑक्टोबर रोजी लाचलुज प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची चांगलीच बदनामी झाली. त्या घटनेनंतर जिल्हा परिषदेचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आला आहे.


 मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तात्काळ पाच वर्षापेक्षा अधिक काळ एकाच विभागात असलेल्या सुमारे 20 कर्मचाऱ्यांच्या तातडीने टेबल बदलले. किरण लोहार हे निलंबित झाल्यानंतर त्यांच्या जागेवर उपशिक्षणाधिकारी संजय जाहीर यांची प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


किरण लोहार लाच प्रकरणाला आता 25 दिवस होत आले, जावीर हे एकदाही लोहार यांच्या खुर्चीवर बसले नाहीत. त्या खुर्चीवर बसणे त्यांनी वर्ज केले.  लोहार यांच्या खुर्चीच्या शेजारी दुसरी खुर्ची टाकून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्याचबरोबर आपल्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसूनच त्यांचा कारभार सुरू आहे.  


शिक्षणाधिकारी कार्यालयातील केबिन पाहिले असता यापूर्वी लोहार हे पूर्व दिशेला तोंड करून बसत होते मात्र आता ती दिशा बदलण्यात आली आहे. संजय जावीर यांनी पश्चिमेकडे खुर्चीचे तोंड केले आहे.  यावरून 'लोहार यांची खुर्चीची दिशा नको रे बाबा'...! अशी मजेदार चर्चा प्राथमिक शिक्षण विभागात रंगल्याचे ऐकण्यास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments