वृद्धाचा दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर नग्नावस्थेत ठिय्या ; काय आहे प्रकार अन् कर्मचाऱ्यांनी कसा सोडवला प्रश्न

 
सोलापूर : दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी एका वृद्ध शेतकऱ्याने अंगावरील सगळे कपडे काढून नग्न अवस्थेत बराच वेळ ठिय्या मांडला होता. हे पाहण्यासाठी बघायची मोठी गर्दी झाली होती. 


संबंधित शेतकऱ्याचे नाव कुमार नामदेव मोरे असे असून त्यांचे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले आहे ती नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याने मोरे हे तहसील कार्यालयात आले होते मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी थेट अंगावरील सर्व कपडे काढून नग्न आंदोलन केले. 


संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला हे समजले असता ते तातडीने तेथे येऊन त्या शेतकऱ्याला कपडे घालण्यास लावले कार्यालयामध्ये नेऊन कागदपत्रे दाखवले असता दहा नोव्हेंबर रोजीच त्यांचा अतिवृष्टीचा मदत निधी बँकेकडे पाठवल्याची माहिती मिळाली. तेव्हा कुठे मोरे शांत झाले. एवढ्या दिवसात चेक कसा जमा झाला नाही? असा प्रश्न करत बँकेकडून चूक दिसून आल्यास त्या ठिकाणी मी नग्न आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.Post a Comment

0 Comments