होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणेच हाच उद्देश ; वादग्रस्त विषयांशी सोलापूर विकास मंचचा काहीही संबंध नसल्याचा जाहीर खुलासा

 सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पुनम गेट समोर गेल्या चोवीस दिवसांपासून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री सुरू आहे ज्यास सोलापूर शहर आणि जिल्हातील १८७ हुन अधिक प्रतिष्ठीत संस्था, संघटना आणि व्यक्ती यांचा जाहीर पाठिंबा प्राप्त झाला, १२,५०० हुन अधिक देशा विदेशातुन प्रत्यक्ष आणि अॉनलाईन पद्धतीने सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणे हाच उद्देश असुन इतर वादग्रस्त विषायांशी सोलापूर विकास मंचचा दुरापास्त संबंध नसल्याचा खुलासा सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांना दिला.


सोलापूरच्या सुसज्ज अश्या होटगी रोड विमानतळावरून तातडीने नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर अभ्यासपूर्ण आणि सातत्याने पाठपुरावा सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे. सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित चक्री उपोषणा विषयी काही अपप्रवृत्तीचे लोक अपप्रचार सामाजात अफवा पसरवण्याचे काम करीत असुन त्याकडे जिल्हा प्रशासनाची संबंधित यंत्रणा विषेश लक्ष ठेऊन असल्याने सोलापूरकरांनी खोट्या माहितीवर आणि अपप्रचारांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे.


सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषणाला समर्थन देण्यासाठी चोवीसाव्या दिवशी कस्तुरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बाहुबली दोशी, वझीर मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे शर अध्यक्ष गौस कुरेशी, सोलापूर जिल्हा इनचार्ज माजी नगरसेवक हारुन शेख, सेक्रेटरी सलीम सय्यद, मुजम्मील शेख, मुबीन बडेपीर, इस्माईल तुळजापुरे, शोएब कडीवुर, आध्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सचिव राजाभाऊ जाधव आदी संघटना आणि व्यक्ती यांनी चक्री उपोषणासाठी सक्रिय पाठिंबा दर्शविला. 


सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई घर आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात काळे झेंडे लावण्याच्या आवाहनाला सोलापूरकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, सुभाष लोणावत, अॅड.दत्तात्रय अंबुरे, जावेद अत्तार, अॅड.संदीप बेंद्रे, प्रसन्न नाझरे, आनंद पाटील, सुहास भोसले, मनोज क्षीरसागर, श्रीकांत बनसोडे, प्रसन्न नाझरे, गणेश शिलेदार सुर्यकांत पारेकर, इक्बाल हुंडेकरी, गणेश पेनगोंडा, अर्जुन रामगिर, राजेंद्र चव्हाण, सहदेव इप्पलपल्ली, विजय कुंदन जाधव आदी सदस्य उपस्थित होते. उपोषणस्थळी सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे, आज पर्यंत एकुण १२,६६७ जणांनी अॉनलाईन, प्रत्यक्ष उपोषणस्थळी आणि चोवीसाव्या दिवशीच्या सह्यांच्या मोहिमेस ३५९ सोलापूरकरांनी सह्या करुन होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस सुरू होऊ पर्यंतच्या चक्री उपोषणासाठी पाठिंबा दर्शविला आणि अॉनलाईन पद्धतीने देश विदेशातुन आजपर्यंत ६४७८ जणांनी देशा विदेशातुन पाठिंबा दर्शविला.

Post a Comment

0 Comments