बापरे ! धर्मराज काडादी यांच्याकडून थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी ; चिमणी मॅटर पेटला ; solapur

 

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने तब्बल वीस दिवसापासून चक्री उपोषण सुरू आहे या उपोषणाची दखल राज्य पातळीवर घेतली गेली आहे. विमान सेवा सुरू करण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी ही एकमेव अडथळा आहे ती चिमणी पडल्याशिवाय विमानसेवा सुरू होणार नाही असे चित्र आहे.

दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका बाजूने विमान उतरेल आणि त्याच बाजूने विमान उडेल असा सुवर्ण मध्ये काढला होता. मात्र सोलापूर विकास मंचने अद्यापही उपोषण मागे घेतले नाही. 

शनिवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक स्वतः धर्मराज काडादी हे उपोषण स्थळे आले, विकास मंचचे प्रमुख केतन शहा यांच्याशी त्यांनी चर्चा केली परंतु या चर्चेदरम्यान वादावादी झाली आणि काडादी हे भान हरपून थेट केतन शहा यांना अरे तुरे बोलत तुला गोळ्या घालून ठार मारेन अशी धमकी देत खिशातील बंदूक काढून दाखवली. 

अतिशय शांत स्वभावाचे असणारे धर्मराज काडादी यांचे हे रौद्ररूप पाहून सर्वच चकित झाले. ही खळबळजनक बातमी सध्या सोलापूर शहरासह सोशल मीडियावर वाऱ्यासारखी फिरत आहे पहा उपोषण स्थळे नेमके काय घडले हा व्हिडिओ...


Post a Comment

0 Comments