शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर झाले जॉईन ; सुलभा वटारे यांचाही 'वट' वाढला ; प्रमोशनपूर्वी 'शिखरे'मात्र अडचणीत

 


सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सोमवारी वेगळे चित्र पहायला मिळाले. दीड महिन्यानंतर शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे रुजू झाल्याने काही कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला, प्रमोशन झालेल्या शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वटारे या सुद्धा किटकीटीतून मोकळ्या झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. कार्यालयाचा अधीक्षक म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पडणाऱ्या  सुनील शिखरे यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्याने प्रमोशनपूर्वी त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.


माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे दीड महिन्याच्या आजारी रजेनंतर सोमवारी कामावर रुजू झाले. त्यामुळे योजना शिक्षणाधिकारी म्हणून सुलभा वटारे यांनी पदभार घेतला असून, कार्यालयासाठी जागा मिळावी म्हणून झेडपीच्या सीईओंकडे पत्र दिले आहे.


माध्यमिक शिक्षणाधिकारी नोव्हेंबरअखेर आजारी पडले. ते प्रदीर्घ रजेवर गेल्याने पदभार उप शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान आजारपणामुळे बाबर यांनी दोनवेळा रजा वाढविली. याच काळात वटारे यांची पदोन्नतीवर योजना शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. रजेवरून बाबर सोमवारी कामावर हजर झाले. त्यामुळे वटारे या कार्यमुक्त झाल्या. त्यांनी योजना शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार घेतला. या पदाची निर्मिती नव्याने करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय व कर्मचारी देण्याबाबत शासनाने जिल्हा परिषदेला कळविले आहे. त्यामुळे तसे पत्र वठारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केले आहे.


योजना शिक्षणाधिकारी म्हणून वटारे यांच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे. पूर्वी अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षणाधिकारी असे या पदाचे नाव होते. आता त्यात योजना शिक्षणाधिकारी असा बदल करीत प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व योजना राबविण्याची जबाबदारी दिली गेली आहे. यासाठी ३५ पदे निर्माण करण्यात आली आहेत. निरंतर शिक्षणाधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली पुन्हा १७ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. झेडपीकडून हे कर्मचारी वर्ग करून घेण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments