वेक अप सोलापूर फाउंडेशनने घेतली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची भेट ; या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा

 सोलापुर येथील छत्रपती संभाजीराजे चौक( पुना नाका) पासून CNS hospital ते सोरगाव ५४ मीटर रस्त्याच्या कामासाठी दिनांक ५ डिसेंबर २२ रोजी शासनाकडून महापालिकेस बॅकेचे कर्ज घेण्यास परवानगी देण्यात आली आहे,  रस्ता हा सोलापूरच्या विविध विकास योजना व सुधारणेच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.  २० सप्टेंबर २२ रोजी  शहर अभियंता यांच्या कार्यालय मध्ये वेक अप फाउंडेशनच्या शिष्टमंडळबरोबर सविस्तर चर्चा होऊन शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. यामुळे शासनाने आता कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे. 


याच पार्श्वभूमीवर सोमवारी वेक अप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याचे काम होत नव्हते. यामुळे सोलापूर जनतेची मोठी जिवितहानी झाली आहे. आता या रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे, तरी या पत्राद्वारे आपणास विनंती करित आहोत की, आपण या बाबतीत तातडीने लक्ष घालून सदर काम सुरू करावे व सोलापूरचा सर्वागीण विकास साध्य करावा. 


या रस्त्याचे काम महापालिका प्रशासन तातडीने सुरू करणार आहे असे आश्वासन  महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कांरजे यांनी सदर शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात वेक अप सोलापुर फौडेशनचे अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय जाधव, सुहास भोसले, आंनद पाटील, प्रतिक खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments