ब्रेकिंग ! जलजीवन, बांधकाम, जनसुविधाची कामे तपासण्याचा अधिकार सीईओ स्वामींनी दिला यांना ; अन्यथा काळ्या यादीत टाकेन

 


सोलापूर जिल्हा परिषदेची समन्वय सभा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर,  कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी सीडीपीओ यांची या बैठकीला उपस्थिती होती. 

यावेळी सीईओ स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टोचले, सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत शेकडो कामे सुरू आहेत त्याचबरोबर बांधकाम विभाग यासह जन सुविधा, नागरी सुविधा यांचीही कामे आता सुरू होतील त्यामुळे प्रत्येक कामाची तपासणी झालीच पाहिजे. अभियंते हे तर पाहतीलच परंतु कामे तपासण्याचे अधिकार मी आता विस्तार अधिकारी, सिडीपीओ यांना देतो, तसे आदेश गटविकास अधिकारी यांनी काढावेत मक्तेदारांच्या कामात हलगर्जीपणा आढळला तर त्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करावी आमच्याकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा स्वामी यांनी यावेळी दिला.Post a Comment

0 Comments