आमदार सुभाष देशमुख यांची चांगली संकल्पना ; प्रत्येक गावात हे सुरू करा...

 


दक्षिण तालुका हा कृषी पर्यटनमध्ये अग्रेसर व्हावा व प्रत्येक गावाने एक कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना तालुका कृषी विभागाच्या आढावा बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी केली. 

सोमवारी दक्षिण सोलापूर कृषी विभाग आढावा बैठक आ.देशमुख यांनी घेतली. बैठकीमध्ये आमदार देशमुख यांनी कृषी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी आमदार देशमुख यांनी  फळबाग लागवडसह महाराष्ट्र शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा व येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली.

शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक माहिती व उत्पादित केलेल्या मालाला मार्केट उपलब्ध होण्यासाठी कृषी मॉल उभा करण्यासाठी प्रस्ताव सादर करा त्याचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून हे काम मार्गी लावू असे आमदार देशमुख यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.  यावेळी दक्षिण सोलापूर कृषी विभागाचे अधिकारी, संचालक व जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. चनगोंडा हाविनाळे, हणमंत कुलकर्णी  उपस्थित होते.

 


Post a Comment

0 Comments