सोलापुरात सुधीर खरटमलांना वाढदिनी खासदारकीच्या शुभेच्छा ; काँग्रेस नेत्यांचे सूचक व अनुमोदन ! Political

 
सोलापूर : पूर्वाश्रेमीचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांचे बॉस, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमलेले सुधीर खरटमल यांचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिनी त्यांना सर्वपक्षीय शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या सुधीर गॅस एजन्सीच्या कार्यालयात त्यांनी सकाळी दहा पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. 


यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर आरिफ शेख व ज्येष्ठ शकील मौलवी या दोन नेत्यांनी येऊन खरटमल यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छामध्ये आरिफ भाईंनी खरटमल यांना तुम्ही खासदार व्हावे अशा शुभेच्छा देत अनुमोदन मौलवी यांचे असल्याचे उपस्थित पत्रकारांना सांगितले.


खासदारकीच्या शुभेच्छा देण्यामागील सुद्धा कारण तसेच आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा निवडणुकीत दोन वेळा पराभूत झाल्याने यंदाची लोकसभा ते लढवणार नाहीत असे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे या खासदारकी लढवणार का नाही हे मात्र अजूनही निश्चित झालेलं नाही. 


अशातच काँग्रेसचा दोन वेळा पराभव झाल्याने सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळावी अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे सुधीर खरटमल हे संभाव्य उमेदवार होऊ शकतात त्यात कोणतीही शंका नाही. खुद्द काँग्रेस पक्षाच्या नेत्यानी सुधीर खरटमल यांना खासदारकीच्या शुभेच्छा दिल्याने आता सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे.

Post a Comment

0 Comments