अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड बुधवारी सोलापुरात ; असा आहे दौरा

 सोलापूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे बुधवार 8 फेब्रुवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर तिथून ते शासकीय विश्रामगृहाकडे जातील. सकाळी साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृहावरून ते अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतील. 


सोयीनुसार अक्कलकोट येथील लाला राठोड यांच्या घरी चहापान कार्यक्रम होईल. सकाळी 11 वाजता अक्कलकोट वरून ते पुन्हा सोलापूरला येतील. सोलापूर शहरातील फडकुले सभागृहात बंजारा समाज सहविचार सभेस ते उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा संपल्यानंतर सोयीनुसार मुळेगाव तांडा येथील संदीप राठोड यांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देणार आहेत या भेटीनंतर ते तुळजापूरकडे प्रयाण करतील.Post a Comment

0 Comments