धक्कादायक ! भाजप नेते सुनील कामाठी यांचे निधन ; अश्विनी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

 

सोलापूर : राजकीय वर्तुळात एक धक्कादायक घटना समोर येत असून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन झाले आहे. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 


या घटनेने खड्डा तालमीवर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षामधूनही शोक व्यक्त केला जात आहे. कामाठी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री तब्येत अस्वस्थ कारणाने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शनिवारी दिवसभर ते सर्वांशी बोलत होते, रविवारी दुपारी मात्र त्यांची तब्येत अत्यंत खालावली. त्यांना एअर अंबुलन्स मधून मुंबईला हलवण्याचे नियोजन करण्यात आले होते. शेवटी सोमवार पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.


सुनील कामाठी यांची खड्डा तालीम प्रसिद्ध आहे, शिवजन्मोत्सव तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नुकतेच झालेल्या शिवजन्माचा मिरवणुकीमध्ये सुनील कामाठी यांच्या खड्डा तालीमने मोठी जंगी मिरवणूक काढली होती. तसे पाहायला गेले तर सुनील कामाठी हे पूर्वीचे कट्टर शिवसैनिक होते.


2017 सालच्या महापालिका निवडणुकीत त्यांना भाजप कडून तिकीट मिळाले आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला तेव्हापासून ते माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. 

Post a Comment

0 Comments