दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड ग्रामपंचायतीच्या सात पैकी सहा सदस्यांनी सरपंच सुजाता भाऊसाहेब सुतार यांच्या विरोधात आविश्वास दाखल केला आहे. याबाबतचे पत्र दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांच्याकडे सादर केले आहे.
सोमवारी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयामध्ये सहा सदस्यांनी एकत्र येत सरपंच सुजाता सुतार या अधिकाराचा गैरवापर करीत आहेत. सरपंच आपल्या कार्यामध्ये कसूर करत आहेत. तसेच ग्रामसभेच्या ठरावाचे अंमलबजावणी करत नसल्याची खंत व्यक्त करत गेल्या दोन वर्षांपासून एकही ग्रामसभा घेतलेली नाही. तसेच ग्रामसभेच्या सदस्यांना विश्वासात न घेता सर्व कामे करीत आहेत. मनमानी निर्णय घेत आहेत. शासनाकडून आलेल्या परिपत्रकाचे पालन गावच्या विकासासाठी होत नाही आणि मासिक सभेमध्ये वाचून दाखवले जात नाही, अशा बाबतच्या तक्रारी या पत्रामध्ये करण्यात आल्या आहेत.
अविश्वास ठरावावर उपसरपंच महादेवी लक्ष्मण बनसोडे, सदस्य मीनाक्षी विलास बनसोडे, शांताबाई अण्णप्पा बूळगुंडे, काशीबाई मदुराया बुळगुंडे, बेबीताई सूर्यकांत पाटील, महेश लक्ष्मण पाटील या सदस्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. यावेळी पॕनलप्रमुख पंडित बुळगुंडे, गुराप्पा बुळगुंडे, चंद्रकांत जमादार, लक्ष्मण बनसोडे, आमसिध्द बुळगुंडे, उदयकुमार पाटील, विलास बनसोडे आदी उपस्थित होते.
0 Comments