सोलापूर : सोलापूरच्या प्रशासनातील काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या मागील दोन दिवसात बदल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली. उपविभागीय अधिकारी क्रमांक एक हेमंत निकम यांचीही शासनाने बदली केली आहे. त्यांना सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. निकम यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती देण्यात आलेली नाही.
हेमंत निकम यांची ही कारकीर्द तशी वादग्रस्त राहिली आहे. सोलापूर सांगली महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जादा रक्कम वाटल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. याबाबत चौकशी सुरू होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सुद्धा निकम यांच्या कामकाजावर नाराज दिसून आले. सोलापुरात त्यांचा दोन वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला होता, त्यामुळे ते सुद्धा बदलीच्या प्रतीक्षेत होते.
0 Comments