सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची अखेर बदली झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने त्यांची ही विनंती बदली केली आहे. त्यांना शिक्षणाधिकारी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे.
मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी भास्कर बाबर यांचा बाबत तक्रार केली होती त्यामुळे बाबर यांना मुंबईचे फेरे मारावे लागले. या विषयात बाबर यांच्यावर कारवाई होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांची विनंती बदली झाली आहे. केवळ चार महिन्यानंतर बाबर हे सेवानिवृत्त होत आहेत.
मागील तब्बल दीड महिने ते आजारी रजेवर होते त्यामुळे उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे त्यांचा अतिरिक्त पदभार होता आता वटारे यांचेही प्रमोशन झाले आहे आणि त्या शिक्षणाधिकारी योजना म्हणून सोलापुरात कार्यरत आहेत बाबर यांची बदली झाल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार पुन्हा वठारे यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे.
या बदली प्रकरणी भास्कर बाबर यांच्याशी संपर्क साधला असता मी मार्च महिन्यातच विनंती बदलीसाठी आपला अर्ज दिला होता असे सांगत आता राहिलेले चार महिने त्या ठिकाणी सेवा देणार अशी माहिती दिली.
0 Comments