सोलापूर जिल्हा परिषदेकडे बालकांच्या आरोग्याचा मास्टर प्लॅन तयार ; काय आहे जागरूक पालक, सुदृढ बालक मोहीम

 


सोलापूर - वेळेत रोग निदान व उपचार झाले तर पुढची पीढी सुदृढ राहील असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदे मध्ये सिईओ यांचे निजी कक्षात आज व्हीसी चे आयोजन करणेत आले होते. 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्री तानाजी सावंत यानी दिलेल्या सुचनेनुसार सोलापूर जिल्हयातील अंदाजे 11लाख 14 हजार, 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलीच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग याच्या समन्वयाने अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या अभियानामध्ये बालकांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार असून या तपासणी अभियानात दोषी आढळणाऱ्या बालकांवर तातडीने उपचार करण्यात येणार आहे. हे अभियान 9 फेब्रुवारी पासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.

कोरोना कालावधीत सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून माझे मुल माझी जबाबदारी अभियान राबविले होते. या अभियानात  हृदयरोगाची लक्षणे असणारी काही बालके आढळून आली होती. त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्यामुळे आज ती बालके सुदृढ आहेत. कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत आपल्या यंत्रणेने उत्तम काम करून कित्येक बालकांना जिवदान दिले होते. याबद्दल सीईओ स्वामी यांनी सर्वांचे यावेळी अभिनंदन केले. याच धर्तीवर राज्य शासनाने जागरूक पालक, सुदृढ बालक मोहीम घोषित केली आहे. या मोहिमेची पुर्वतयारी व सुक्ष्म नियोजनाची व्हिडिओ कॉन्फरन्स सीईओ स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बगाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा मोहीम अधिकारी जावेद शेख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या अभियानाची उद्दिष्टे सांगितली.


1- 0 ते 18 वर्षापर्यंतची बालकाची / किशोरवयीन मुला-मुलीची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.

2- आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार करणे.

3- गरजू आजारी बालकांना सदर्भ सेवा देऊन उपचार करणे (उदा- औषधोपचार, शस्त्रक्रिया ई)

5- प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे,

6- सुरक्षित व सुदढ़ आरोग्यासाठी समूपदेशन करणे.


यामध्ये एकुण 52 आजारांच्या तपासण्या करण्यात येणार असून तपासणीची ठिकाणे पुढील प्रमाणे असतील.

1) शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविदयालये,

२) खाजगी शाळा, ३) आश्रमशाळा

४) अंधशाळा, दिव्यांग शाळा ५) अंगणवाडया,

६) खाजगी नर्सरी बालवाडया, ७) बालगृहे, बालसुधार गहे

८) अनाथ आश्रम, ९) समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली).

१०) शाळाबाहय (यांचे उपरोक्त दिलेल्या नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी) मुले-मुली, 

अभियानाचे संनियंत्रण करण्यासाठी राज्य कृती दल, जिल्हा कृती दल,  म.न.पा कृती दल व तालुका कृती दल असणार आहेत.

Post a Comment

0 Comments