सोलापुर :-राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काची व जिव्हाळ्याची जूनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे व इतर नेते मंडळी, यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथून भव्य मोर्चा काढला होता.
त्यांच्या या मागणीस आणि आंदोलन मोर्चास काँग्रेस पक्षाने जाहिर पाठिंबा देऊन सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोर्चात सक्रिय सहभाग घेतला.
आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या भूमिकेवर तोफ डागली. 50 खोके द्यायला पैसे येतात तुम्हाला निवडणुकीला हेच कर्मचारी चालतात तर या लाखो कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मंजूर करायला हरकत काय? ही आमची मागणी अथवा विनंती समजू नका हा तुम्हाला इशारा आहे जोपर्यंत या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा थेट इशारा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
0 Comments