सोलापूर महापालिका नगर अभियंता लक्ष्मण चलवादी कोरोना पॉझिटिव्ह

 

सोलापूर : एकीकडे H3N2 या व्हायरलने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण ही वाढत आहेत. सोलापूर शहरात सुद्धा कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढताना दिसू लागले आहेत. दरम्यान, महापालिकेचे प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना कोरोनाची लागण झाली आहे.  नगर अभियंता चलवादी यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी दिली.

हे ही वाचा (मुस्लिम बहुल भागातील राजकीय किंगमेकर ; सर्वसमावेशक नेतृत्व)

 नगर अभियंता चलवादी यांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या लक्ष्मण चलवादी यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी स्पष्ट केले. 


चलवादी यांच्याकडे नगर अभियंता विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. कामाच्या निमित्ताने विविध लोकांशी त्यांचा संपर्क असतो. त्यातुनच ही लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. यापुर्वी देखील चलवादी यांना कोरोनाची लागण झाली होती.


शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यातच एच३एन२ या संसर्गाचाही प्रादुर्भाव होत आहे. महापालिकेत लक्ष्मण चलवादी यांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. (साभार-लोकवार्ता)


Post a Comment

0 Comments