सोलापुरात मोर्चेकरी कर्मचाऱ्यांची हुल्लडबाजी ; 'शिवसेना-राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षांना बोलू दिले नाही ; व्हिडीओ पहा

 

सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात 18 लाख कर्मचारी संपावर आहेत शनिवारी संपाचा पाचवा दिवस होता सोलापुरात महाविकास आघाडी नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य समोरच्या काढण्यात आला या मोर्चात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव शिवसेनेचे शहराध्यक्ष विष्णू कारमपुरी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हजारोंचा हा विराट मोर्चा होता. मोर्चा जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला त्या मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले. ज्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष कारमपुरी हे भाषण करायला उठले काही वेळ भाषण केलं मात्र मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला आणि या नेत्यांना भाषण करता आले नाही नेमकं काय घडले? पहा व्हिडिओ..

Post a Comment

0 Comments