सोलापुरात 'फडणवीसांवर'कारवाईसाठी 'अभाविप' आक्रमक ; चंद्रकांत दादांना कार्यक्रमाला येऊ देणार नाही ; काय आहे नेमके प्रकरण

 





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरू झाल्या पाहिजे, कमवा व शिका योजनेला घेऊन विद्यापीठाची उदासीनता, उपहारगृह भ्रष्टाचार, पदवी प्रमाणपत्र लवकर मिळावी, अभ्यासमंडळावर केलेली बेकायदेशीर नियुक्ती  अशा विविध मागण्यासाठी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापुरात आक्रमक झाली आहे. 


नुकतंच विद्यापीठ प्रशासन याविषयाला घेऊन गांभीर्य दिसत नव्हती. यामुळे अधिसभा बैठक उधळून या रास्त मागण्या कुलगुरुंसमोर मांडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांचा होता. परंतु आपल्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकेतर कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. 


दरम्यान प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, महानगर मंत्री आदित्य मुस्के, महानगर सहमंत्री सागर टक्कळकी, महानगर सहमंत्री श्रीनाथ गायकवाड या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन कुलगुरू फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अन्यथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापुरातील कार्यक्रमाला येऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.



Post a Comment

0 Comments