सोलापुरात मोर्चात आली मोठ्या हौशेने 'कांतारा'ची टीम ; आणि असा झाला अपेक्षाभंग

 





सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी नवनवीन युक्त्या आजमावत आहेत. सोलापुरात शनिवारी निघालेल्या भव्य अशा मोर्चात काही कर्मचारी पीपीई किट घालून कोविड योद्धांच्या वेशभूषेत आले होते मात्र या मोर्चात काही चेहऱ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते चेहरे होते नुकत्याच सुपरहिट झालेल्या 'कांतारा' चित्रपटाच्या कलाकारांच्या वेशभूषेतील कर्मचाऱ्यांचे.


हे कर्मचारी होते सोलापूर महापालिकेतील कांतारा मधील मुख्य भूमिकेच्या वेशभूषेत विशाल मुनाळे, गावकरी म्हणून उमेश युवनाती, राजा म्हणून गंगाधर कांबळे आणि जमीनदार म्हणून स्वप्नील चाबुकस्वार. मोठे हौसेने या मोर्चामध्ये आपली कला सादर करण्यासाठी त्या वेशभूषेत हे शिक्षक आले होते मात्र मोर्चाला प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे गोंधळ उडाला, नियोजनाचा अभाव होता, कोण कुणाचे ऐकत नव्हते. 


गर्दी आणि गोंधळ पाहून थेट भाषणे सुरू झाली. रखरखत्या उन्हात कांतारा चित्रपटाच्या वेशभूषेतील हे सर्व युवा शिक्षक "मेरा नंबर कब आएगा" या भूमिकेत होते मात्र अखेर यांच्या नशिबी अपेक्षाभंग आला, अखेर हुबेहूब केलेल्या वेशभूषेचा काही उपयोग झाला नाही नाराज होऊन या सर्व शिक्षकांना परतावे लागले. हे त्यांचं दुर्दैव म्हणावे लागेल.




Post a Comment

0 Comments