सोलापुरात आडम मास्तरांनी मिळवल्या शिट्ट्या अन् टाळ्या ; अजित दादांना चांगलेच फटकारले ; आमदार प्रणितीताईंनीही महिलांमध्ये बसून ऐकले भाषण

 






सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सोलापुरातील शासकीय निमशासकीय सर्वच कर्मचारी सध्या बेमुदत संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करून लक्ष वेधून घेण्यात येत आहे. या आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. 


शनिवारी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची या मोर्चाला उपस्थिती होती. आडम मास्तर यांनी राज्यातील शिंदे फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 


ते म्हणाले, आता कुणी आले तरी सुद्धा ही जुनी पेन्शनची लढाई थांबू शकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला समन्वय समितीची बैठक बोलावली आहे तोपर्यंत आम्ही वाट पाहू. आंदोलनकर्त्या समितीने जुनी पेन्शन योजना लागू करतो असे केवळ एका ओळीचे पत्र मागितले आहे. हा एल्गार आहे, उद्या आक्रोश होईल, ज्या दिवशी महाराष्ट्र बंद होईल मुख्यमंत्री शिंदे तुम्हाला हे कर्मचारी वर्षा बंगल्याच्या बाहेरही येऊ देणार नाहीत. असा इशारा देत मास्तर यांनी आपला मोर्चा महाविकास आघाडीकडे वळवला. विशेष करून अजित पवार यांना त्यांनी जाब विचारणा केली. तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होता, उपमुख्यमंत्री असताना सभागृहात तुम्ही भाषण केले, ते अजूनही माझ्या कानात घुमते आहे, काय म्हणालात जुनी पेन्शन विसरून जावा. 



Post a Comment

0 Comments