सोलापूर : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावी मोदी @9 हा कार्यक्रम व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राणे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी त्यांचे हेलिकॉप्टरने नरखेड येथील हेलिपॅड जवळ आगमन होईल, तिथून ते संतोष पाटील यांच्या तोरणा या निवासस्थानी जातील त्या ठिकाणी एक तास त्यांचा राखीव राहील दुपारी साडेबारा वाजता ते शेतकरी मेळाव्याकडे जाणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारी चार वाजता राणे हे हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.
Comments
Post a Comment