सोलापूरात भीमसैनिक झाला .आक्रमक ; हातातील पेन सोडून वेगळा विचार करावा लागेल, दिला इशारा ; नांदेडचा विषय पेटला
सोलापूर : नांदेड जिल्ह्य़ातील बोंडार गावाचे भिम सैनिक अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ सोलापूरातील तरुण तरुणींसह भिम सैनिकानी एकत्र येऊन अन्याय अत्याचार विरोधी संघटनाच्या माध्यमातून पक्ष विरहित मोर्चा काढण्यात आला. यावेळी भीमसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले,
अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीने जोर धरला आहे अन्यथा आम्हा युवकांना हातातील पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.
हातात निळे झेंडे, डोक्यावर निळी टोपी, आणि महिला व युवतींनी हातामध्ये फलक घेऊन हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिरासमोरून पासपोर्ट कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला आणि या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यानंतर आपल्या मागण्यांची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या आहेत मागण्या
• अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियातील सदस्यास सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे.
• सदर तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा.
•आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात यावा.
• मारेकऱ्यांबरोबर या कटातील मास्टर माईंड पर्यंत पोहोचण्याकरिताआरोपी आणि सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांचा सीडीआर तपासण्यात यावे.
• अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास पन्नास लाखाची शासकीय मदत जाहीर करण्यात यावी.
•महाराष्ट्रातील सर्व बौद्धांना शस्त्र परवाने देण्यात यावे.
आतिश बनसोडे, उमेश काळे, सचिन वाघमारे, पिंटू डावरे, प्रवीण कांबळे, रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, वैशाली उबाळे, साधना गायकवाड, अखिल शाक्य, दत्ता सिद्धगणेश, अण्णासाहेब वाघमारे, केरू जाधव, दिपक गवळी, प्रणव पात्रे, अमित गायकवाड, प्रवीण सुरवसे, विनोद जाधव, अविनाश आठवले, बाळासाहेब बनसोडे, विशाल चतुर, विशाखा उबाळे, सचिन कोलते, पंकज ढसाळ, सिद्धार्थ गुड्डे, राजरत्न कदम, उमेश काळे, प्रवीण सुरवसे यांच्यासह संघटना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment