सोलापूरात पाणी व स्वच्छतेच्या कार्यशाळेत घडले अनेक किस्से ; सीईओ म्हणाले नोकरीमुळे बायको मिळाली तर कोहिणकर यांनी एसी मध्ये ग्रामसेवक यांचा काढला घाम
सोलापूर - जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशन साठी १५ वा वित्त आयोगांतर्गत ६० टक्के निधीचा समावेश केलेशिवाय आराखड्यास मान्यता देणेत येणार नाही अशा स्पष्ट सुचना शासनाने दिले आहे. चंद्रभागा नदी आपली आई आहे. तिला प्रदूषित करू नका असे भावनिक आवाहन असेही जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
सोलापूर येथील हुतात्मा स्मारक मंदिर येथे आज स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जल जीवन मिशन अंतर्गत गटविकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभिसंता, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत यांचे जिल्हा स्तरीय कार्यशाळेते आयोजन करणेत आले होते. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सिईओ दिलीप स्वामी हे बोलत होते.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर , पाटोदेचे सरपंच भास्करराव पेरे पाटील , कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) इशाधीन शेळकंदे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड , गट विकास अधिकारी सचिन खुडे , आनंद मिरगणे , मनोज राऊत ,विनायक गुळवे , प्रशांत काळे , माणिकराव बिचुकले , बाळासाहेब वाघ , महेश पाटील, दिपक चिलवंत यांच्यासह सर्व सहाय्यक गट विकास अधिकारी , विस्तार अधिकारी उपस्थित होते. प्रस्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.
सुत्रसंचालन ऐश्वर्या हिवारे यांनी केले. तर आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी मानले. निवृत्त विस्तार अधिकारी यांचा गौरव सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ व विस्तार अधिकारी सतिन चव्हाण व विस्तार अधिकारी बीली पाटील यांनी मंद्रुप साठी माझी वयुंधरा अभियानात दिलेले योगदाना बद्दल गौरव करणेत आसा. ब्रॅन्ड अॅम्बेसिडर मोहंमद अय्याज यांचा गौरव करणेत आला. ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण गळगुंडे यांचा निवृत्ती निमित्त सत्कार करणेत आला. कलाकार दत्तात्रय येडवे व बिदरकर यांचा गौरव केला. एक तास नाटिकेतून योजना समजावून सांगून ग्रामसेवक यांनी मतंर्मुग्ध केले.
.. .. तरच गावचे आराखड्यास मान्यता - सिईओ स्वामी
………………
सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ३० टक्के व जलजीवन मिशन साठी ३० टक्के निधी १५ वा वित्त आयोगांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व सामुहिक शौचालया साठी तरतुद केली तरच गावांच्या आराखड्यास मान्यता देणेत येईल. तशा स्पष्ट सुचना शासनाने दिले आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. पालखी मार्गांवर स्वच्छता, प्लास्टीक मुक्त अभियान, कचरा मुक्त अभियान राबवून भाविकांना चांगल्या सोयी द्या असे आवाहन केले. चंद्रभागा नदी आपली आई आहे. तिला प्रदूषित करू नका असे भावनिक आवाहन असेही जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
नोकरीमुळे बायको मिळाली - सिईओ स्वामी
नोकरीमुळे बायको मिळाली. समाजात नोकरी मुळे इज्जत आहे. या नोकरीशी कोणी बेईमानी करत असेच तर चुकीची आहे. गावात न जाता नोकरीशी बेईमानी करू नका. जे लोक वेळेवर जातात त्यांना टोमणे मारून तुला काय बक्षीस मिळणार का ? असेही विचारले जाते. हे चुकीचे आहे. असेही सिईओ स्वामी खडसावून यांनी सांगितले .पालखी मार्गांवर भाविकांना चांगल्या सुविघा द्या. कचरा मुक्त अभियान चांगले पध्दतीने राबवा. प्लास्टीक व्यवस्थापन करा. असेही आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
जे लोक वृक्ष लावणार नाहीत त्यांना कुठलेही लाभ नाही- सिईओ दिलीप स्वामी
……………..
आषाढी यात्रा तोंडावर आली आहे. पालखी मार्गांवर १२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करा. वृक्ष लागवड जतन व संवर्धन करा. जे कुटूंबे वृक्ष लागवड करणार नाहीत त्यां कुटूंबाना कुठलाही लाभ मिळणार नाही. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
पुढच्या जन्मा महिला ग्रामसेवकाचा जन्मी जावे - भास्करराव पेरे पाटील
........
जे जिल्हाधिकारी व सिईओ यांना शक्य नाही ते ग्रामसेवक यांनी शक्य आहे. लोकांची थेट सेवा करणेची संधी आहे. असे मत पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.
सिईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले सायकल बॅंक व विविध नाविण्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक पेरे पाटील यांनी केले. इतकी मेहनत घेणार सिईओ मी पाहिला नाही. यांना निवडणूक लढवायची नाही. ते तळमळीने काम करतात. मग ग्रामसेवक यांनी मागे राहू नये. ग्रामसेवक खुप ताकदवान आहे. तो सर्वाचे अंकीत असतो गावात काम करताना खुप कसरत करावे लागते पण या सेवेचे सोनं करा. सिघानिया सारखे उद्योगपतीस मुलांनी घराबाहेर काढले आपण किसकी झाडपत्ती चांगले वागा. सेवा करा असे प्रांजळ आवाहन भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
कोहिणकर यांनी एसी मध्ये ग्रामसेवक यांचा काढला घाम
…………….
घरकुला वरून अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी एसी मध्ये ग्रामसेवक यांचा घाम काढला. नगर जिल्हयात १४ हजार घरकुले पुर्ण होतात आपणच मागे का ? जलजीवन मिशन ची ग्रामपंचायतीची जबाबदारी लक्षात घ्या. जलजीवन मिशन फलक दर्शन भागात फलक लावा. योजनेची माहिती द्या. दहा टक्के लोकवर्गणी भरायची आहे. असेही कोहिणकर यांनी सांगितले.
या प्रसंगी ग्रामसेवक यांचे मधून ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पदी पदोन्नती दिले बद्दल ग्रामसेवक संघटनेचे वतीने सिईओ दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचा तुळशीहार घालून ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ यांनी गौरव केला. वाढदिवसाचे औचित्य साधून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व प्रकल्प संचालक अमोल जाधव यांचा ग्रामसेवक संघाचे तात्यासाहेब पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
ओडिफ प्लस साठी चार घटक लक्षात ठेवा - अमोल जाधव
…….
गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सामुहिक शौचालय व वैयक्तिक शौचालय पुर्ण झाले नंतर ओडिफ प्लस गाव होणार आहे. ग्रामपंचायतीने १५ लक्ष च्या खालील आराखडे वेळेत तयार करा. कामे सुरू करा. चार महिनेयात छोटी कामे पुर्ण करा. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.
मंद्रुप ग्रामपंचायतीचा यथोचित गौरव
……….
माझी वयुंधरा अभियानात राज्यात प्रथम आलेल्या मंद्रुप ग्रामपंचायतीचा गौरव सिईओ दिलीप स्वामी व भास्करराव पेरे पाटील, यांचे हस्ते सरपंच अनिता कोरे व ग्रामसेवक नागनाथ भिमाशंकर जोडमोटे यांचेसह सर्व सदस्यांचा गौरव करणेत आला.
मोहंमद अय्याज यांनी गायले व्यसनमुक्तीवर गीत ..!
……………….
महान गायक व वेतन मुक्तीचे सोलापूर जिल्ह्याचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर मोहंमद अय्याज यांनी व्यसनमुक्त वर तसेच महाराष्ट्र गीत भारदस्त आवाजात गाऊन ग्रामसेवक यांचे मनावर आनंदाची झालर टाकली. सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते ब्रॅन्ड अॅम्बेसिडर पदी निवड झालेबद्दल गायक मोहंमद अय्याज यांचा गौरव करणेत आला.
उत्कृष्ट नियोजन करा - शेळकंदे
………
ग्रामसेवक यांनी पंधरावा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जसजिवन मिशन यांची एकत्रित सांगड घाला. या पुढे शासन निर्णायनुसार आराखड्यास मान्यता देणेत येईल. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
विधायक कृतिशीलतेचा गौरव...
---
शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने रानवेध फाउंडेशन व आम्ही मंद्रूपकर ग्रुप तर्फे हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता व स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. माझी वसुंधरा अभियानात मंद्रूप ग्रामपंचायतीस राज्यस्तरावरील पहिला क्रमांक मिळाला. त्यामध्ये रानवेध व आम्ही मंद्रूपकर ग्रुपचे योगदान आहे. त्याची दखल घेऊन शुक्रवारी जिल्हा परिषदेने रानवेध व आम्ही मंद्रूपकरग्रुपचा गौरव केला. जलजीवन मिशन अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा शुक्रवारी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात झाली. जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक व सरपंच यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व ज्येष्ठ आदर्श सरपंच पाटोदा (संभाजीनगर) श्री. भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते रानवेध टीमचा गौरव करण्यात आला. यावेळी आम्ही मंद्रूपकर ग्रुपचे रवी केवटे, सचिन साठे, सिद्धू नंदुरे, अजय साठे, गणेश कोरे, जगन्नाथ खरात, विनोद कामतकर उपस्थित होते.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे , घनकचरा व्यवस्थापन तज्ञ मुकूंद आकुडे , मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर , संवाद सल्लागार सचिन सोनवणे , क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी ,आनंद मोची यांच्यासह सर्व सी.आर.सी. यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment