सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना आता विवाह नोंदणी व प्रमाणपत्राची सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. अर्जदारांनी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरातील नागरिकांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आता विवाह नोंदणी व प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यासाठी आदेश दिले आहेत. यासाठी वधू वर हे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावेत, लग्न कोठे झाले असले तरी वर किंवा वधू त्यांचे रहिवासी शहरात नोंदणी करू शकतात, पारसी, ख्रिश्चन व जू या धर्मियांच्या नोंदणी या कायद्याअंतर्गत करण्यात येणार नाही. मुस्लिम धर्म वर - वधू असतील तर निकाह नाम्याची अधिकृत इंग्रजी भाषांतरित प्रत सोबत आणावी, असेही आवाहन करण्यात आले.
दरम्यान शहरातील नागरिकांनी www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर जाऊन मॅरेज रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून सर्व ऑनलाईन माहिती भरावी असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी वधू-वर यांचे आधार कार्ड, शाळा सोडलेल्या दाखला किंवा जन्म व जातीचा शासकीय पुरावा, पुरोहित किंवा काझी यांचे आधार कार्ड, तीन साक्षीदारांचे आधार कार्ड, लग्नपत्रिका व लग्नातील फोटो, आंतरजातीय विवाह असेल तर शंभर रुपये स्टॅम्पवर एफिटिव्हेट करून आणणे, वर वधू यांचे स्वतंत्र शंभर रुपये स्टॅम्पवर शपथपत्र करून आणणे, घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाचा न्यायालयीन हुकूमनामा जोडणे आवश्यक, विधुर असल्यास पहिल्या पती-पत्नीचे मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.
Comments
Post a Comment