VIDEO | "अरे मी पाटलाची औलाद आहे, आणि पाटला सारखाच राहणार" ; सुरेश पाटील यांची आणखी एक भूमिका आली समोर
सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धुसफुस सध्या चव्हाट्यावर आहे. ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपली डावलणूक होत असल्या प्रकरणी नाराजी व्यक्त करत प्रभागातील समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर सुरेश पाटील पक्ष सोडणार का अशा चर्चेला उधाण आले मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटलांची संपर्क साधत पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर शुक्रवारी सुरेश पाटील हे एका पत्रकार परिषदेला आले असता या विषयावर पत्रकारांनी त्यांना छेडले तेव्हा त्यांनी मनातील आणखी खदखद बोलून दाखवली. "मी पाटलाची अवलाद आहे आणि पाटला सारखाच राहणार" या शब्दात त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. सुरेश पाटील काय म्हणाले पहा...
Comments
Post a Comment